चेतना पुनर्वसन - सेवा सहयोग

जागतिक मातृदिन !!!!!


रविवार १०मे २०२० ला जागतिक मातृदिन होता. आज एक आमच्या खुशालीच  आणि तिच्या आईचा असा मस्त असा छोटासा Video आमच्या ग्रुप वर आला.


सेवा सहयोग आणि अनेक लोकांच्या सहकार्यातून आणि माझ्या मैत्रिणी पूजा, श्रुती, शीतल ह्यांच्या सहकार्याने वस्ती मधील बहुविकलांग मुलांसाठी काम सुरु करूनही ४ पेक्षा अधिक वर्ष झाली.  चेतनाचे काम आता सध्या २ सेंटर मध्ये सुरु झाले आणि करोना सारख्या आजाराने त्यात थोडा खंड पडला. 

आम्ही चौघींनी एकच केले प्रत्येक पालकांशी संवाद साधत गेलो.  प्रत्येक मुलाची एक वेगळी गोष्ट होईल असा हा blog आहे.

मयूर गजरे - हा स्वमग्न, छोटेसे घर, वडील नोकरी करतात आई घरीच असते. ह्याच्या पालकांनी आम्हाला वस्तीतील अनेक कुटुंबापर्यत फूडकीट पोहोचवण्यास मदत केली. ह्याच्या आईचे विशेष कौतुक कारण ह्यांचे घर पहिल्या मजल्यावर आणि मयूर सारखा खाली जाण्यासाठी धडपडत असतो, त्याचा आरडा ओरडा असूनही ही  माऊली कधीही त्रागा करत नाही. पण त्याच्यातल्या चांगली गोष्टीच सांगत राहते. स्वतःने अंघोळ करतो, डब्या वर डबे चढून उभे राहतो. अगदी तो सारखा ग्यालरीत चढत असला तरी हसत हसत सांगते सारखे त्याला मागे मागे करून त्याला घरात बसवते. 

खुशाली देवकर - एकल पालकत्व त्यामुळे नोकरी, घर, मोठ्या मुलाचे इंजीनियर  व्हायचे प्रयत्न त्यामुळे कायम मुलीकडे दुर्लक्ष व्हायचे. इच्छा असूनही वेळ देऊ शकायची नाही. पण ह्या ४० दिवसात आई काय करू शकते आणि किती बदल आपल्या मुलांमध्ये घडवू शकते ह्याचे मूर्तिमंत उदाहरण. ह्या मध्ये आमच्या तिन्ही शिक्षकांचेही कौतुक.
Lockdown ही  समस्या नसून एक संधी समजूयात असे सतत आपल्या पालकांना सकारत्मक संदेश देत होत्या. त्यात एक दिवस मेघा , म्हणजे खुशालीच्या आईची तब्येत बिघडली तिला डॉक्टर कडे घेऊन जाण्याचे काम मुलाने केले  आणि आम्ही  डॉक्टरांचा सल्ला मिळवून देण्यात मदत केली, पण त्या दिवशीचे जेवण सेवा सहयोगच्या सहकाऱ्याने लगेच नेऊन दिले. सेवा सहयोगचे  आभार किती मानावेत,  म्हणजे फक्त प्रणामच!!!

सगळ्यात म्हणजे मेघाने खुशालीला सांगितले मला बरे नाही, डॉक्टरांकडे जाऊन येते, एकटी घरात बसली. संध्याकाळी आपल्या गुडघ्यांवर चालत देवापुढे गेली आणि देवाकडे तिच्या अगम्य भाषेत प्रार्थना केली, त्यात आई हा शब्द कळला. ती माता त्या दिवशी धन्य झाली.

आई च्या प्रयत्नाचे फळ म्हणजे जी मुलगी अपल्या  गुडघ्यांवर चालायलाही तयार नव्हती ती ह्या दिवसात आईच्या हातात असलेल्या बारला धरून गुडघ्यांवर चालायला लागली.

 
 ह्या मातेला माझा त्रिवार सलाम. मी २०१३ पासून हिला ओळखते, काम सुरु करण्यापूर्वी ही करा हो तुम्ही चांगले होईल. असे बोलून हीच माझ्या मागे होती.

पियुष डोंगरे - पियुशच्या आईचेही  किती कौतुक करावे तेवढे कमीच. मुलगा बहुविकलांग, नवरा कॅन्सरग्रस्त. त्याच्या अतिशय महागड्या टेस्ट दीनानाथ हॉस्पिटल मध्ये डॉ सुजित निलेगावकर  ह्यांच्या मदतीने ह्या lockdown च्या काळात करायला मदत घेऊन करून घेतल्या. २ केमो झाल्या. पण आईला सांगितले होते मुलाला छोट्या छोट्या कामात घ्या आणि त्या माऊलीने ही  आमच्या पुजा ताई नि सांगितलेले  ऐकले आणि छोटी छोटी कामे मुलाला  शिकवायला लागली. 

हे सगळे आम्ही आधीही सांगताच असू पण lockdown चा खूप सकारत्मक रीतीने फायदा आमच्या प्रत्येक पालकांनी करून घेतला.

त्यातही आई ही  सगळ्यात पुढे आहे. 

सगळ्यात म्हणजे निसर्ग आपली किमया दाखवत असतो. आमची एक छोटी छकुली १ वर्षापूर्वीच डॉ. संतोष जोशींकडे दीनानाथ मध्ये हृदय शस्त्रक्रिया झालेली, दुसरे मूल  म्हणजे अतिशय काळजीपूर्वक घेण्याचा निर्णय. पण आले देवाच्या मनात तिथे चालेना आपले काही. काल पासून २ मोठ्या सोनोग्राफी करून घेतल्या, मयुरी आमची वस्तीतील सहाय्यक, तिच्या बरोबर सगळीकडे बरोबर जाऊन  आधी बाळ व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली. सोनोग्राफी करतानाचा तो जीव गर्भाशयातला  पहिला आणि देवाचे ह्या कलेचा नमुना पाहून डोळे भरून आले. 

आमची मयुरी म्हणजे सोने आहे, वस्तीतील काहीही काम करायला तयार. ह्यावर्षी आम्ही सगळ्या मागे लागलो तर जिद्दीने १२वी दिली. स्वतःच्य मुलीसाठी सगळ्या मधून मार्ग काढत शस्त्रक्रिया करवून घेतली. प्रगतीची प्रगती आम्ही स्वतः अनुभवली.

अशा ह्या सगळ्या माता, ह्या सगळ्यांना प्रणाम करायला हा blog चा प्रपंच. खूप जणी आहेत. 

म्हणून ह्या मातृदिनी त्या माझ्या वस्तीतील मातेला सलाम !!!!!!

Comments

  1. किती भारी काम आहे अनिता !

    ReplyDelete
  2. तुमच्या, तुमच्या सहकारी मैत्रिणींच्या, या मुलांच्या पालकांच्या आणि या सर्व मुलांच्या कौतुकाला शब्दच सापडत नाहीत... तुमच्या संपूर्ण टीमसाठी Salute !

    ReplyDelete
  3. हे सर्व अत्यंत अवघड काम आहेच पण ते तुम्ही ज्या मायेने करता त्यासाठी तुम्हा सर्वांना त्रिवार नमस्कार.

    ReplyDelete
  4. केवढे मोठे काम करता आहात आपण!
    शब्द अपुरे. सहानुभूती वेगळ्या पातळीवर पोचते जेव्हा काही कृती घडते.

    ReplyDelete
  5. अनिता किती छान काम करतेस तू. खरंच तुला, तूझ्या मैत्रिणींना आणि त्या पालकांना शतशः प्रणाम 🙏🙏😊

    ReplyDelete

Post a Comment