Posts

चेतना पुनर्वसन - सेवा सहयोग

Image
जागतिक मातृदिन !!!!! रविवार १०मे २०२० ला जागतिक मातृदिन होता. आज एक आमच्या खुशालीच  आणि तिच्या आईचा असा मस्त असा छोटासा Video आमच्या ग्रुप वर आला. सेवा सहयोग आणि अनेक लोकांच्या सहकार्यातून आणि माझ्या मैत्रिणी पूजा, श्रुती, शीतल ह्यांच्या सहकार्याने वस्ती मधील बहुविकलांग मुलांसाठी काम सुरु करूनही ४ पेक्षा अधिक वर्ष झाली.  चेतनाचे काम आता सध्या २ सेंटर मध्ये सुरु झाले आणि करोना सारख्या आजाराने त्यात थोडा खंड पडला.  आम्ही चौघींनी एकच केले प्रत्येक पालकांशी संवाद साधत गेलो.  प्रत्येक मुलाची एक वेगळी गोष्ट होईल असा हा blog आहे. मयूर गजरे - हा स्वमग्न, छोटेसे घर, वडील नोकरी करतात आई घरीच असते. ह्याच्या पालकांनी आम्हाला वस्तीतील अनेक कुटुंबापर्यत फूडकीट पोहोचवण्यास मदत केली. ह्याच्या आईचे विशेष कौतुक कारण ह्यांचे घर पहिल्या मजल्यावर आणि मयूर सारखा खाली जाण्यासाठी धडपडत असतो, त्याचा आरडा ओरडा असूनही ही  माऊली कधीही त्रागा करत नाही. पण त्याच्यातल्या चांगली गोष्टीच सांगत राहते. स्वतःने अंघोळ करतो, डब्या वर डबे चढून उभे राहतो. अगदी तो सारखा ग्यालरीत चढत असला तरी हसत हसत सांगत